अंगदुखी आणि आयुर्वेद
अनेक लोकांना सतत अंग दुखी चा त्रास होत असतो ते नेहमी सांगतात डॉक्टर सतत हात –पाय दुखत आहे किंवा नेहमी पूर्ण शरीर ठणकल्या प्रमाणे दुखत राहते ,शरीराला तेल लावले किंवा चोळले तर थोड्या वेळ बरे वाटते पण पुह्ना अंग दुखी चा त्रास व्हायला लागतो .कधी कधी तर अंग दुखी इतकी असते कि काही च काम सुद्धा त्यामुळे होत नाही . …….
अंग दुखी हा रोग नाही तर हे अनेक व्याधीत येणारे लक्षण आहे ..आयुर्वेदानुसार अंग दुखी हे शरीरातील वात बिघडल्याचे द्योतक आहे .शरीरातील वात वाढल्याने अंग दुखी चा त्रास होत असतो .कुठल्या हि प्रकारचे दुखणे किंवा वेदना याला कारणीभूत म्हणजे वात दोष.वातव्याधीचे पूर्वरूप सांगताना अंगदुखीचा निर्देश केलेला आढळतो.
भेदस्तोदोऽर्तिराक्षेपो मुहुश्चायास एव च ।।
….माधवनिदान
भेद म्हणजे अंग फुटल्याप्रमाणे वेदना होणे, तोद म्हणजे टोचल्याप्रमाणे वेदना होणे, एकंदर शरीर दुखणे, झटके येणे, कमालीचा थकवा येणे ही सर्व लक्षणे वातविकाराची पूर्वरूपे आहेत . त्यामुळे सतत अंगदुखी असल्या शरीरातील वात वाढला आहे असे समजण्यास हरकत नाही .
शरीरातील वात दोष वाढण्याचे हूप करणे आहेत जसे आहारात अधिक रुक्ष ,थंड पदार्थ घेणे ,शिळे अन्न खाणे ,रात्री जागरण करणे ,खूप प्रवास करणे ,खूप परिश्रम करणे ,किंवा खूप व्यायाम करणे यामुळे शरीरातील वात दोष वाढतो .
अंग दुखी हे लाषण जरी एक असले तरी त्याची प्रचीती हि निर -निराळी असते .येणारे रुग्ण तक्रार करतात कि अंग दुखी इतकी आहे कि आतून हाडे दुखतात आहे असे वाटते तर कधी म्हणतात कि तापेमध्ये जशी अंग दुखी असते त्याप्रमाणे अंग दुखत आहे ,तर कधी म्हणतात कि पूर्ण अंग पिळून टाकावे कि काय असे वाटते ,तर कधी ठणकल्या प्रमाणे अंग दुखी आहे असे म्हणतात .सगळ्यां मध्ये हि अंग दुखी वेगळे असण्याची कारण म्हणजे धातू आश्रय .वाढलेले किंवा प्रकुपित झालेला वात ज्या-ज्या धातूच्या आश्रयाने असतो त्या नुसार लक्षणे उत्पन्न होतात.उदाहरणार्थ – प्रकुपित वायू त्वचा किंवा रसधातूच्या आश्रयाने असल्यास बोटांच्या पेरांमध्ये वेदना होतात. तर प्रकुपित वायू रक्ताच्या आश्रयाने राहिल्यास संपूर्ण शरीरात तीव्र वेदना तर असतात सोबत संपूर्ण अंगात दह देखील असतो .स्पर्शासहत्व हे लक्षण असते म्हणजे त्वचेला स्पर्श सुद्धा सहन होत नाही .प्रकुपित वायू हा मांस व मेदाच्या आश्रयाने असल्यास शरीर जड वाटते आणि , सुया टोचल्याप्रमाणे वेदना असतात .थोडे से हि काम केले तरी अतिशय थकवा जाणवतो. तर प्रकुपित वायू अस्थी व मज्जाधातूच्या आश्रयाने राहिल्यास बोटाची पेरे आणि हाडांमध्ये तीव्र वेदना होतात, जणू एखादे हाड मोडल्यानंतर जशी वेदना होते त्याप्रमाणे दुखणे असते .शरीरातील सर्व सांधे दुखतात .वेदना निरंतर स्वरुपाची असते त्यामुळे व्यक्तीला झोप सुद्धा लागत नाही.
कधी कधी अंग दुखणी हे दुसऱ्या व्याधीच्या लाक्षनारूप असते .जसे उलट्या-जुलाबांमुळे शरीरातील रसधातू कमी झालाअसता किंवा काही कारणाने डिहायड्रेशन झाले असता देखील अंगदुखी निर्माण होते .रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता किंवा शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण कमी झाले असता किंवा शरीरात विशिष्ट जीवन सत्वा चा अभाव झाले असता अंग दुखी निर्माण होते .ज्वर ,राजयक्ष्मा ,उदर ,वातरक्त यासारख्या विकारामध्ये देखील अंग दुखी हे लक्षण दिसून येते .
कधी कधी मानसिक ताण सुद्धा अंगदुखी निर्माण करण्याचे मोठे कारण ठरते असे म्हणतात न कि शरीर थकले कि मन सुद्धा थकते आणि मन थकले कि शरीर सुद्धा थकते. त्यामुळे जेह्वा व्यकी सतत तणावात असतो किंवा सतत चिंतेत असतो किंवा निराशेत असतो त्यामुळे त्याला अंग दुखी चा त्रास व्हायला लागतो .परत दुसरी बाजू म्हणजे शोक-चिंता –भय –निराशा हे सुद्धा वात दोषाला प्रकुपित करतात .
आमसंचीती हे सुद्धा अंगदुखी निर्माण करण्याला कारण असते .घेतले अन्न निट न पचल्यामुळे शरीरात आम दोष निर्माण होते .शरीरात आम निर्माण झाल्यामुळे अंगदुखी बरोबर आळस, अपचन, तोंडाला चव नसणे, काम न करताही थकवा जाणवणे, गुंगी येणे हि लक्षणे उत्पन्न होतात .
शाररीक अशक्तपणा सुद्धा अंग दुखी निर्माण करतो .कमी शाररीक बाल असणाऱ्या व्यक्तींनी थोडे हि काम केले तरी त्यांचे हात-पाय व अंग दुखायला लागते.कधी कधी अपुरी झोप किंवा अर्धवट झोप हि सुद्धा अंग दुखी ला कारण असते .
थोडक्यात म्हणायचे झाले कि अंग दुखी असल्यास त्याची तव्पुरती वेदनाशामक औषधी घेऊन चिकित्सा करण्या पेक्षा हि अंगदुखी कोणत्या कारणाने आहे सर्व प्रथम ते कारण शोधणे गरजे चे आहे .
वातदोषाने होण्यार्या अंगदुखी चे शमन करण्यासाठी वातशामक चिकित्सा करावी .तेल हे वात शामानासाठी श्रेष्ठ असे सांगितले आहे .म्हणून वातशामक तेलाने संपूर्ण शरीर अभ्यंग केल्यास उत्तम लाभ मिळतो. स्नेहानासोबत स्वेदन केल्यास शरीराला लावले जाणारे तेल हे अधिक मात्रेत शरीरात मुरते आणि अंगदुखी कमी होण्यास मदत मिळते .
आयुर्वेदात संपूर्ण शरीराला रोज तेल लावण्याचा निर्देश केला आहे .आठवड्याला किमान दोनदा तरी अभ्यंग आणि स्वेदन केल्यास शरीरातील प्रत्येक संस्थेचे पोषण होते ,रक्तसंचार वाढतो ,नाडी तंतुना बाल मिळते आणि सर्व प्रकारची दुखणी कमी होते .हे अभ्यंग आणि स्वेदन जर trained therepist करून करून घेतले तर अधिकच उत्तम .
बस्ती-आयुर्वेदात वाताची मुख्य चिकित्सा म्हणजे बस्ती .म्हणून वातशमानासाठी अनुक्रमे स्नेह आणि निरूह बस्ती चा व्यात्यायास प्रयोग केल्यास उत्तम लाभ मिळतो .यासाठी दशमूळ ,एरंड ,रास्ना ,बला यासारख्या औषधी वनस्पतींचा वापर केल्या जातो .
जेह्वा अंग दुखी हि आमामुळे असते तेह्वा सर्व प्रथम लंघन –दीपन –पचन असे उपचार करावे . आमपचन साठी तिक्त-कटू द्रव्याची योजना करावी .आणि त्यानंतर शरीरातून आम दोष बाहेर काढण्यासाठी विरेचन हे पंचकर्म करावे .
मानसिक ताणामुळे होणारी अंगदुखी दूर करण्यासाठी शिरोभ्यंग करावे यासाठी चंदनतेल ,क्षीर बला तेल ,ब्राह्मी तेल यासारख्या तेलाचा वापर करावा. याशिवाय शिरोधारा ,शिरोपिचू ,पादाभ्यंग यांचा सुद्धा मानसिक ताणात उत्तम लाभ होतो .
शरीर बल कमतरतेने होणार्या अंगदुखी मध्ये बृहंण चिकित्सा केल्यास लाभ मिळतो .
अंगदुखी हि ज्या व्याधी च्या संबंधाने निर्माण झाली आहे त्याची चिकित्सा करावी जसे पांडू याव्याधीमुळे अंगदुखी निर्माण झाल्यास रसधातू वाढविणारी चिकित्सा केल्यास लाभ मिळतो आणि अंग दुखी कमी होते .सर्दी –तापामुळे अंग दुखी असल्यास गरम कंबल न्थाराल्यास घाम येऊन ताप कमी होतो आणि अंगादुखणी कमी होते .त्याच बरोबर दालचीनि चा तुकडा ,सुंठी चा तुकडा ,लवंग ,गावाती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून २ वेळा घेतल्यास तापाचे शमन होऊन अंग दुखी कमी होते .
घरगुती उपचार –
हळदी चे दुध रोज घेतल्याने सुद्धा अंगदुखी कमी होते
५ लवंग आणि थोडी मिरे चहा मध्ये टाकून घेतल्यास अंग दुखी कमी होते .
झोप उत्तम येण्यासाठी दुहात अश्वगंधा चूर्ण टाकून खडीसाखरे बरोबर घेतल्यास फायदा होतो.
अंग उखी मध्ये मिठाच्या पाण्यात टावेल भिजवून त्याचा शरीर शेक केल्यास हि लाभ मिळतो .
आल्याचे साल अधून ते गरम करावे व नंतर सुती कापडात बांधून त्याचा जिथे जिथे वेदना आहे मसाज केल्यास लाभ मिळतो .
पारिजातकाची पाने अंगदुखी कमी करणारी असतात. ताजी पाने वाटून काढलेल्या एक चमचा रसात चमचाभर आल्याचा रस व खडीसाखर मिसळून घेण्याने अंग दुखणे कमी होते.
मेथी चे लाडू हिवाळ्यात रोज खाल्ल्याने वाताचे शमन होऊन अंग दुखी कमी होण्यास मदत मिळते .
हाडांमध्ये दुखत असले किंवा फ्रॅक्चर झाल्यामुळे हाड दुखत असेल तर बाभळीच्या बियांचे चूर्ण मधाबरोबर घेण्याने फायदा मिळतो .